सोशल मीडियाने चिमुकलीला मिळवून दिले दूध !

17

सामना ऑनलाईन । मनमाड

सोशल मीडियाचे वापराचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडियाच्या मदतीने पाच महिन्यांच्या बाळाला दूध मिळाले आहे. त्यामुळे भुकेने व्याकूळ झालेल्या बाळाची भूक फेसबूकने भागवली.

एक दाम्पत्य रेल्वेने गुजरातहून तिरूवनवेली येथे निघाले होते. मात्र बाळ कार्तिकीसाठी घेतलेले दूध नासल्याने बाळासाठीच्या दुधाचा प्रश्न तेथे निर्माण झाला. एक्सप्रेस थेट रत्नागिरीला थांबणार होती आणि रेल्वेत दुधाची सोय नव्हती. बाळ भुकेने रडत असल्याचे पाहून त्याच डब्ब्यात असलेल्या नेहा बापट या महिलेने फेसबुक ट्विटर, व्हॉट्सअपच्या माध्यमातून या बाळाला दूध मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला. या मोहिमेत नेहा यांच्या मित्रांनी कोकण रेल्वेलाही ट्विट केले.

अखेर कोलाड रेल्वे स्थानकावर बाळासाठी दूध घेऊन रेल्वेचा माणूस तयार असेल असे रेल्वेने कळवले. त्यानंतर कोलाड स्थानकावर ट्रेन थांबली आणि कार्तिकीला दूध मिळाले. दूध मिळाल्यानंतर रडणारे बाळ आणि त्याच्या दुधासाठी चिंतीत असलेले त्याचे आई-बाबा या दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान होते.

आपली प्रतिक्रिया द्या