कर्नाटक निवडणुकीवर ‘ट्रोल’ धाड, वाचा मजेदार ट्विट्स

23

सामना ऑनलाईन । मुंबई

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता चार दिवस उलटलेत. सोशल मीडियावर मात्र अजुनही या निकालांचा बोलबाला आहे. विधानसभा निवडणुकींच्या निकालांवर काही मजेदार ट्विस सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

कर्नाटक विधानसभेतील त्रिशंकू परिस्थिती दाखवणारा एक मजेशीर फोटो अनुराग सक्सेना या युजरने पोस्ट केलाय. त्याला नेटकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

सागरने बाहुबली चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉगचा आधार घेत कर्नाटकच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

समुद्राची लाट खिळे ठोकून अडवणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा फोटो आशिष मिश्रा यांनी पोस्ट केला असून याला ‘काँग्रेकडून मोदी लाट रोखण्याचा प्रयत्न’ असे कॅप्शन आशिष यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनची पूजा करतानाचा फोटो सुजेश यांनी ट्विट केला आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसमधील भाजप अध्यक्ष अमित शहा, अंपायरच्या वेशातील माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांना आपल्यासोबत नेत आहेत, अशी कल्पनाशक्ती वापरत एक फोटोही लक्षवेधी ठरला आहे.

तर एका युजरने राहुल गांधीचा फोटो पोस्ट करुन त्याला ‘बच्चे कि जान लोगे क्या ‘ असं कॅप्शन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या