फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी लष्करी अधिकारी कोर्टात; अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊ नका

फेसबुक, इन्स्टाग्रामसह 89 मोबाईल अॅप 15 जुलैपर्यंत डिलिट करण्याच्या लष्करी हेरखात्याच्या आदेशाविरुद्ध लेफ्टनंट कर्नल पी. के. चौधरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जवानांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारे हे आदेश असल्याचे या अधिकाऱ्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

दुर्गम भागात तैनात असलेल्या लष्करी जवानांचा सतत मृत्यूशी सामना होत असतो. त्या परिस्थितीत त्यांना सतत आपल्या कुटुंबियांची आठवण येत असते. दूरवरच्या आपल्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोबाईल फोन असतो. कुटुंबातील समारंभाचे फोटो ते फेसबुक व अन्य अॅप्सवरून पाहू शकतात. त्यामुळे त्यांना आनंद मिळतो. कुटुंबियांच्या जवळ आहोत याची ती जाणीव असते. तो आनंद वरील आदेशाने हिरावून घेऊ नका असे चौधरी यांनी याचिकेत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या