हिंसाचार पसरवणाऱ्य़ांवर नजर ठेवा, गृहमंत्री अमित शहांचे निर्देश

1935

दिल्लीत हिंसा करणार्‍यांवर नजर ठेवा, शांतता समिती स्थापित करा असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. तसेच दिल्लीत सीआरपीफ जवानांची संख्या वाढवली जाईल असेही अमित शहा म्हणाले.


दिल्लीत CAA विरोधात मोठा हिंसाचार झाला. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदे केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शहा यांची भेट घेतली. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमित शहा यांनी दिल्लीत शांतता समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पोलीस आणि स्थानिक आमदार यांच्यात योग्य समन्वय असला पाहिजे असेही शहा यांनी सांगितले. हिंसाचार प्रभावित क्षेत्रात ड्रोनच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यात येणार आहे.


राज्यातील हिंसा थांबवण्यासाठी सीआरपीएफचे संख्याबळ वाढवले जाईल असे शहा यांनी सांगितले. जे लोक हिंसा आणि अफवा पसरवतील त्यांना अटक केली जाईल. अफवा पसरवली जाऊ नये म्हणून सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाईल असेही शहा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या