सोशल मीडियावर ‘#प्रिये’ची लाट, तरुणाई सैराट

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल हे सांगता येत. आली लहर केला कहर अशीच अवस्था सोशल मीडियावर असते. आज अचानक लहर सुरू झाली आहे ती ‘#प्रिये’ची आणि तरुणाई अक्षरश: सैराट झाल्यासारखी पोस्टचा पाऊस पाडत आहेत.

सोशल मीडियावर ‘#प्रिये’चा पूर पाहून १४ फेब्रुवारी पुन्हा आली काय? असा प्रश्न पडावा अशी अनेकांची गत झाली आहे. मी बाहुबली तर तू ‘कटप्पा’ #प्रिये, मी विदाऊट तिकीट तू टीसी #प्रिये, मी यॉर्कर तर तू बाउंसर मी चौकार तर तू षटकार #प्रिये, अशा अनेक वन लायनर ते कविता फॉरमॅटमध्ये नेटकरी बॅटिंग करताय. कुणी चेष्टामस्करी तर कुणी पॉलिटिकल कविता, वाटेल त्या फॉरमॅटमध्ये फटकेबाजी सुरू आहे. त्यामुळे ‘#प्रिये’ला चांगलीच भाव खाऊन गेली आहे.

या आधीही ‘#sixwordstories’, ‘#amarphotostudio’ या सारखे अनेक हॅशटॅग्जना नेटकऱ्यांनी चांगाला प्रतिसाद दिला होता. ‘आली लहर केला कहर’ हे देखील असंच हिट ठरला होतं.