मरेन पण त्याला काही होऊ देणार नाही..कुत्र्याबाबत अनोखं प्रेम

काहीजणांचे प्राण्यांवरचे जीवापाड प्रेम पाहून भारावून जायला होतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका माणसाने स्वत:च्या तोंडाला मास्क न लावता कुत्र्याच्या तोंडाला मास्क लावले. त्याला एका माणसाने त्याचे कारण विचारले असता त्याने दिलेले उत्तर ऐकून तो हैराण झाला.

मोहनलाल असे त्या इसमाचे नाव आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता सरकारने मास्क लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले. या माणसाने स्वत:च्या तोंडावर मास्क न लावता कुत्र्याच्या तोंडाला मास्क लावला आहे. त्याचा एकाने व्हिडीओ बनवला आणि इंरनेटवर शेअर केला. अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरले नाही.

सध्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ जबरदस्त फिरतोय. या व्हिडीओत हा माणूस त्या कुत्र्याला खांद्यावर घेऊन कुठेतरी जात आहे. मात्र या माणसाने स्वत: मास्क न लावता आपल्या कुत्र्याला लावले आहे. त्याच्या या वागण्याबाबत एका माणसाने त्याला मास्क न लावण्याचे कारण विचारले. त्यावर त्याने जे उत्तर दिले त्याने तो माणूसही हैराण झाला. त्याने सांगितले मी मरेन, पण याला काही होऊ देणार नाही. मी त्याचे लहानपणापासून संगोपन केले आहे. तो माझा मुलगा आहे. माझा तो. कुत्र्याचे नाव पुरु आहे.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजा घेतली आहे. काहींनी याला बोलतात प्राणीप्रेम, दुसऱ्या युजरने सांगितले गरिब असलो तर काय झाले, ह्दयाने श्रीमंत आहोत, तर तिसऱ्या युजरने त्याच्याबरोबरच तुलाही मास्क लावलेस तर त्याच्यासोबत जास्तवेळ घालवू शकशील असा सल्लाही दिला.

 

आपली प्रतिक्रिया द्या