सोशल मीडियावर अफवा पसरवल्याबद्दल इस्लामपुरात एकाला अटक

789

सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. समाजात अफवा आणि गैरसमज पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. अमित कदम असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात इस्लामपूर पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई केली.

अमितने काही मेसेज व्हायरल केले होते. यामध्ये त्याने एका बड्या नेत्याने कोरोनाबाधिताला आश्रय दिल्याचं म्हटलं होतं. या नेत्याने आपले राजकीय वजन वापरून कोरोनाबाधित कुटुंबाची तपासणी न करता आणले असं त्याने या मेसेजमध्ये लिहिलं होतं. हा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सातत्याने टीका करतो असंही मेसेजमध्ये म्हटलं होतं. या सगळ्या बाबी बिनबुडाच्या असून नाहक बदनामी करणाऱ्या असल्याचं पोलिसांना तपासात कळाल्यानंतर त्यांनी कदम याला अटक केली. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या