समाजसेवा

14

आपण समाजाचं काही तरी देणं लागतो. या भावनेला आज करीयरची जोड देता येते.

माजसेवेची अनेकांना आवड असते. त्यासाठी काही जण रीतसर शिक्षण न घेता निःस्वार्थ भावनेने प्रयत्नही करत असतात, पण आता काळ बदलला आहे. समाजसेवा या विषयात पदवी प्राप्त करून अनेक प्रकारच्या एनजीओ, समाजसेवी संस्था, समाजकल्याण विभाग, सामुदायिक कार्य यामध्ये सहभागी होऊ शकता.

समाजसेवेचे शिक्षण घेतल्यावर समाजसेवक म्हणून काम करता येतं. या अभ्यासक्रमात प्रायोगिक आणि तात्त्विक स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजसेवकाचं काम कसं करतात हे शिकण्याची संधी मिळते. तसेच प्रत्यक्ष तात्त्विक स्तरावरील अभ्यासही करता येतो. यामुळे शिकतानाच कामाचा अनुभव घेता येतो. ज्याचा करीयरसाठी उपयोग होतो.

महाविद्यालये
निर्मला निकेतन महाविद्यालय, ३८, न्यू मरीन लाईन्स, चर्चगेट, (पूर्व), मुंबई
एसएनडीटी महाविद्यालय, चर्चगेट
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ सोशल सायन्स, नांदेड
कर्वे इन्स्टिटय़ुट ऑफ सोशल वर्क, पुणे

आवश्यक गुण
समाजसेवा ही केवळ गरजूंना आर्थिक मदत करण्यापर्यंतच मर्यादित नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
पीडितांच्या समस्या समजून घेणे, त्यांना भावनिक बळ देणे, सक्षम करणे ही समाजसेवेची खरी व्याख्या आहे. त्यासाठी जागरूकता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी हे गुण विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे.

कोणत्याही क्षेत्रात समुपदेशकाची गरज भासते. त्यामुळे विद्यार्थी समुपदेशक म्हणून काम करू शकतात.
मानवी हक्क आणि सामाजिक न्याय या विषयात अनेक सेवाभावी संस्थामध्ये, कंपन्यांमध्ये आणि वैयक्तिक स्तरावरही विद्यार्थ्यांना चांगल्या संधी आहेत.

या सगळ्याबरोबर शिक्षणतज्ञ म्हणूनही या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.
अनेक विद्यार्थी स्वतःचे ‘एनजीओ’ही सुरू करू शकतात. ‘समाजसेवेबरोबर’ कायद्याचे शिक्षण घेऊन कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम करू शकतात.