मुंबईत डरकाळी वाघाचीच, बाकीच्यांनो मिठाच्या गुळण्या करा!

155

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कंपूने शनिवारी ‘संकल्प मेळाव्या’त गळय़ाच्या शिरा ताणून शिवसेनाविरोधी गरळ ओकली. अखेर व्हायचे तेच झाले, मुख्यमंत्र्यांचा आवाजच बसला. मुख्यमंत्र्यांच्या या ‘बसलेल्या आवाजा’ची मग सोशल मीडियावर चांगलीच टर उडवली जात आहे. रामदेवबाबा पतंजली विक्स बाजारात आणणार असल्याच्या घोषणेपासून मुंबईत डरकाळी वाघाचीच! बाकीच्यांनो मिठाच्या गुळण्या करा!! असा ‘जालीम’ उपायही काही नेटकऱ्यांनी सुचवला आहे.

एवढी फेकाफेकी केली की देवानेसुद्धा चमत्कार करून काही वेळ यांची वाचा बंद केली. मुंबईत खणखणीत आवाज फक्त शिवसेनेचा! – नीलेश बोडके

आमच्या सुप्रियाताई बरोबर बोलल्या होत्या. नळावर पाण्यासाठी बायका भांडतात तसे मुख्यमंत्री ओरडून ओरडून भाषण देत होते. – सचिन कांबळे

कुठल्या काळात राहतात काय माहीत… धर्मयुद्ध, खंजीर, कोथळा, शाहिस्ते खान, कुंभकर्ण, पांडव कर्ण, रावण, दुर्योधन, शकुनी, निवडणूक लढवताय का मालवणी दशावतार नाटक बसवताय? – लोकेश लोंढे

आज शिवसेनेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तोंडाला फेस येऊन घाम फुटून त्यांचा आवाज बसला. ही तर सुरुवात आहे. कमळे, वाघाचा नाद करू नको, नायतर कायमच बसशील. – रमेश साबळे

खोटं बोलू पण रेटून बोलू हे इथे चालणार नाही. ही बाळासाहेबांची मुंबई आहे, मोदींची सुरत नाही. अनेक आवाज शिवसेनेविरोधात उठले आणि संपले. फडणवीसांचा घसा तसा पहिल्याच सभेत कामातून गेलाय. ही तर सुरुवात आहे. आवाज शिवसेनेचाच. – वेदांत कदम

शिवसेनेला पाणी पाजणारा अजूनही जन्माला आलेला नाही अहो, पहिल्याच सभेत शिवसेनेच्या विरोधात बोलताना तुमचा आवाज बसला. अजून 25 दिवस बाकी आहेत. राव, आम्हाला तुमची काळजी वाटतेया. – अमर पोवार
फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस् ऍपवर धमाल सुरू आहे ती अशी…

देवेंद्र फडणवीस यांचा आवाज बसल्यानंतर रामदेव बाबा यांची पतंजली विक्स लवकर बाजारात आणण्याची घोषणा. – आनंद नाचरे

निकाल पाहून कंबरसुद्धा बसेल. बाळासाहेबांची शपथ आम्हाला, शेलार, महापौरांच्या खुर्चीवर तुम्हाला धनुष्यबाण दिसेल. – भगवान सावंत

पारदर्शकता म्हणजे काय रे भाऊ…?
विनोदची डिग्री…
पंकजाची चिक्की…
किरीटचा एसआरए भूखंड…
खडसेचा भोसरी भूखंड…
नागपूरच्या होम ग्राऊंडवर गुंडांचा रोज चाललेला नंगानाच…
आशीषमामाचा कंपनी घोटाळा…
सगळीकडे कुख्यात गुंडांचा उघड प्रवेश…
भाडोत्री राष्ट्रवादी, काँग्रेसची भरती…
नोटाबंदीचा फुसका बार, त्यात झालेले सामान्यांचे हाल…
असे अनेक यांचे पारदर्शी विषय बोलण्यासारखे आहेत…
महाभारत सुरू झालेय, हळूहळू एक एक वस्त्रहरण करू!

आपली प्रतिक्रिया द्या