कोकण रेल्वे मार्गावर ओरोस ते कणकवली या स्थानकांदरम्यान बोर्डवे परिसरात सायंकाळी रुळावर माती आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, मात्र रेल्वेचे कर्मचारी सतर्क असल्याने ही माती बाजूला करून कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या दरम्यान सावंतवाडीकडे जाणारी तुतारी एक्स्प्रेस आणि दिवा एक्स्प्रेस या गाडय़ा कणकवलीत थांबविण्यात आल्या होत्या. सुमारे अर्ध्या तासात रुळावरील माती बाजूला करण्यात आली. त्यामुळे रेल्वे गाडय़ांचा फारसा खोळंबा झाला नाही. बोर्डवे परिसरात रुळावर माती आल्याने तेथून जाणारी मालगाडी काही काळ थांबविण्यात आली होती.