सोलापूरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

सोलापूर शहरातील पुणे नाका भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खाजगी सावकाराच्या तगादा यामुळे आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येते.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नाका परिसरातील हंडे प्लॉट भागात अमोल जगताप वय 35 यांच्या पत्नी मयुरी जगताप वय 28 मुलगा आदित्य वय 7 मुलगी आयुष्य वय चार वर्षे या चौघा जणांनी सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या चौघांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळले आहेत. घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. अमोल जगताप हॉटेल व्यवसाय होते. पोलिसांनी चौघा जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या