प्रा. निनाद शहा महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी

महाराष्ट्र पक्षीमित्रचे 34 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन सोलापूर येथे 10 आणि 11 एप्रिल रोजी डॉ. निर्मलपुमार फडपुले सभागृहात आयोजित केले जाणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पक्षी अभ्यासक, प्रा. डॉ. निनाद शहा यांची निवड झाली आहे. प्रा.शहा हे येथील सोलापूरच्या वालचंद महाविद्यालय येथून प्राणीशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत. पक्षीमित्र चळवळीत ते गेल्या तीन दशकांपासून सक्रिय आहेत. हे संमेलन डॉ. मेतन फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येत आहे. तब्बल 23 वर्षांनंतर सोलापूर येथे संमेलन होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या