सौरऊर्जेवर चालणारा ट्रक, बीडच्या जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्याची करामत

1894

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने सौरऊर्जेवर चालणारा ट्रक निर्माण बनवला आहे. महेश धांडे असं या विद्यार्थ्यांचं नाव असून त्याच्या या प्रयोगामुळे महेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काहीतरी नवीन करण्याची धडपड ही केवळ शहरी भागांमध्ये शिकणार्‍या मुलातच असते असं नाही तर ग्रामीण भागांमध्ये अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलंसुद्धा यात नक्कीच कमी नाहीत हे वारंवार सिद्ध होते. बीड तालुक्यातील सुर्डी जिल्हा परिषद शाळेतील आठवीत शिकणाऱ्या महेश धांडेने अडगळीला पडलेल्या वस्तू एकत्रित करून हा मिनी ट्रक बनवला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत असणाऱ्या महेशला मोठं होऊन इंजिनीअर व्हायचं आहे. यापूर्वीही त्याने अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत. मात्र या सोलर एनर्जीच्या प्रयोगामुळे तो सध्या त्याचं कौतुक होत आहे. सध्या वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून महेशने शाळेत वापरात नसलेल्या एका सोलार प्लेटवर चालणारा ट्रक बनवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या