कश्मीरमध्ये पाकड्यांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने गोळीबार केला आहे. गेल्या तीन दिवसात पाकिस्तानने दुसर्‍यांना शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

शहीद जवानाचे नाव अजून कळालेले नाही. शहीद जवान केरी बट्टल भागात कार्यर्यत होता एवढी माहिती मिळाली आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ले.कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने रात्री गोळीबार केला. त्याला हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

शनिवारीही पाकिस्तानने केलेल्या गोळीबार एक सामान्य नागरिक जखमी झाल होता. कश्मीरच्या पूंछ आणि राजौरी भागात हा गोळीबार झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या