काही गोष्टी सोप्या

  • जेव्हा तुमचे एखाद्या व्यक्तिबरोबर वाद होत असतील, तर त्या व्यक्तीकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करा. असे केल्यास ती व्यक्ती आपोआपच स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेल.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रात्री १० ही झोपण्याची योग्य वेळ असून झोपण्यापूर्वी आरामदायक कपडे घालून झोपा.
  • जेव्हा तुम्ही इव्हेंट किंवा पार्टीला जाता तेव्हा ड्रिंक असलेला ग्लास नेहमी डाव्या हातात पकडा आणि उजवा हात गरम पदार्थ किंवा शेकहँण्डकरिता मोकळा ठेवा.
  • व्यक्ती जेव्हा खरे बोलते तेव्हा खूप हातवारे करून स्वतःचे म्हणणे सांगते आणि जेव्हा ती खोटे बोलते तेव्हा हातवारे न करता सांगते.
  • अननसाचा रस हे एक उत्तम कफ सिरप आहे. हा रस प्यायल्यान खोकला आणि ताप बरा होण्यास मदत होते.
  • कुत्रा हा असा प्राणी आहे, जो माणसाला नैराश्यासून दूर नेऊन आनंद देऊ शकतो.
  • ज्यावेळी तुम्हाला खूप खोकला येत असेल, त्यावेळी हाताची हलकी मूठ तोंडाजवळ ठेवा खोकला थांबायला मदत होईल.
  • जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाल तेव्हा पदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर हात स्वच्छ धुवा. कारण मेन्यूकार्ड अनेकजणांनी हाताळलेले असते.
  • तुमची प्रिय व्यक्ती तुमचे फोटो काढत असेल तर नेहमी स्मित हास्य चेहऱ्यावर असू द्या.