६० टक्के जनतेला निरक्षण कुणी ठेवलं, मोदींची राहुल गांधीवर टीका

84

सामना ऑनलाईन । वाराणसी

देशातील ६० टक्के जनतेला निरक्षर कुणी ठेवलं? मोदींवर आरोप करताय की स्वत:चं बिंब उघडं पाडतायं‘, अशी शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच राहुल गांधी बोलले नसते तर भूकंप झाला असता, अशी खिल्ली देखील उडवली.

वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी सरकारवर सडकून टीका केली. तसेच विरोधकांना लक्ष्य करत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘नोटाबंदीनंतर कोणाचं काळं धन दिसतयं, तर कुणाचं काळं मन दिसतयं‘. तसेच या देशातील काही नेते आणि पक्ष बेईमान लोकांना पाठिंबा देत नोटाबंदीचा विरोध करत आहेत. याचा विचार मी केलाच नव्हता. ते पाकिस्तान सारखेच वागताय, पण देशातील जनता त्रास सहन करून शांतपणे रांगेत उभी राहिली आहे‘, असे म्हणत त्यांनी सामान्य जनतेचे आभार मानले.

काही लोक विरोध करताना, बोलताना इतकी गडबड करतात की समजत नाही ते माझ्यावर टीका करत आहेत की, त्यांनी केलेल्या चुका समोर आणत आहेत‘, असे मोदी म्हणाले. ‘डॉ. मनमोहन सिंग हे मोठे अर्थतज्ञ आहेत, तसेच ते माजी पंतप्रधान आहेत. त्यांनी म्हटले आहे की देशात ५० टक्के लोक गरीब आहेत तिथे कॅशलेस कसे शक्य आहे? पण मोदीने त्यांना गरीब केले का? ही विरासत कुणाची, त्यांना इतकी वर्ष गरीब कुणी ठेवलं‘, असा सवाल मोदींनी केला. माजी अर्थमंत्री चिदंबरम म्हणतात वीज नाही, पण ही वीज काही मोदींनी काढून घेतलेली नाही. इतकी वर्षे वीज का पोहोचली नाही?, असे म्हणत मोदींनी त्यांचे आरोप परतवून लावले.

राहुल गांधी बोलले आणि भूकंपाची शक्यता टळली!

काँग्रेसचे युवा नेता आहेत, ते काही वर्षापर्यंत बोलत नव्हते. पण आता बोलायला शिकताय. त्यांनी बोलणं सुरू केल्यापासून माझा आनंद गगनात मावत नाही. आधी मला कळायचंच नाही की या पॅकेटच्या आत काय आहे, पण आता सगळं कळलं आहे. आता मला वाटते की, ते बोलले नसते तर भूकंप आला असता आणि देशाला इतका मोठा धक्का लागला असता की देश १० वर्ष त्यातून सावरला नसता. मात्र ते बोलले आणि मग भूकंपाची शक्यताच टळली. हे युवा नेता म्हणाले की ज्या देशात ६० टक्के लोक निरक्षर आहेत तिथे कॅशलेस कसे चालणार? पण त्यांना निरक्षर करण्यासाठी मोदींनी जादूटोणा केला नाही, मग इतके वर्ष इतके लोक निरक्षर राहिलेच कसे?, तुम्ही कुणाचं रिपोर्टकार्ड देताय, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता टोला लगवला.

आपली प्रतिक्रिया द्या