Photo – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी घटस्फोटानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तर काहींचा पदार्पणानंतर घटस्फोट झाला आहे. तसेच अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि हिट चित्रपटही दिले. आज आपण अशाच  काही अभिनेत्रींविषयी माहिती घेऊ ज्यांनी लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.

मल्लिका शेरावत

mallika_sherawatमोठ्या पडद्यावर अनेक हॉट आणि बोल्ड सीन देणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने चित्रपट जगतात पाऊल ठेवण्यापूर्वीच लग्न केले होते. तिचे जेट एअरवेजचे वैमानिक करणसिंग गिल यांच्याशी लग्न झाले होते, पण लग्नानंतर वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2002 मध्ये मल्लिकाने ‘जीना सरफ मेरे लिए’ या चित्रपटाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मर्डर’ या चित्रपटात दिलेल्या हॉट दृश्यांमुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

अदिति राव हैदरी

aditi_rao_haidiri

अदितीने फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वी सत्यदीप मिश्रासोबत 2007 साली लग्न केले होते, पण 2013 मध्ये दोघेही वेगळे झाले.  2009 मध्ये ‘दिल्ली 6’ या चित्रपटाद्वारे अदितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

चित्रांगदा सिंहchitragandhaबरेच लोक चित्रगंदाच्या सौंदर्याची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी करतात. 2001 साली मित्र ज्योती रंधावासोबत तिचे लग्न झाले होते, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2003 साली सुधीर मिश्रा यांच्या “हजारो ख्वाहिशें ऐसी” या चित्रपटाद्वारे चित्रांगदाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

माही गिल

mahi_gill

माही गिलचे लग्न अगदी लहान वयात झाले, 1993 साली. जेव्हा ती केवळ 18 वर्षांची होती. तिने तिच्या प्रियकराशी लग्न केले होते. 2019 मध्ये माही आपल्या पतीपासून विभक्त झाली. 2003 साली माही गिलने फिल्म ‘विश्‍व’ या सिनेमातून पदार्पण केले.

विद्या मालवदे

vidya_maldave

फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी विद्या एअर हॉस्टेस् म्हणून काम करत होती. तिथेच तिची कॅप्टन अरविंदसिंग बग्गा यांचाशी ओळख झाली आणि कालांतराने त्यांनी लग्नही केले. सन 2000 मध्ये अरविंद यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर तीन वर्षांनी विद्याने दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या “इंतेहा” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या