हिंदुस्थानात पॉर्नवर बंदी कशाला ? अभिनेत्रीने विचारला सवाल

अश्लील उद्योग कंपनी चालवणाऱ्या राज कुंद्राच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकरणात पूर्वी एका अभिनेत्रीलाही अटक झाली असल्या कारणाने बॉलीवूडही हादरलं आहे. एकेकाळी सलमान खानसोबत चित्रपटात झळकलेल्या सोमी अली हिला या प्रकरणामुळे धक्का बसण्याऐवजी आश्चर्य वाटलं आहे. ज्या देशात कामसुत्राचा उगम झाला त्या देशात पॉर्नवर बंदी कशाला असा प्रश्न सोमीने विचारला आहे. पॉर्न चित्रपट बनवणाऱ्यांच्या, त्यात काम करणाऱ्यांच्या मी विरोधात नाही असंही तिने म्हटलंय.

सेक्सबद्दल बोलणं जितकं टाळलं जातं, तितकी त्याबद्दलची उत्सुकता वाढत जाते असं सोमीचं म्हणणं आहे. पॉर्न बनवणारे किंवा त्यात काम करणारे हे जोपर्यंत लैंगिक शोषण करत नाही किंवा मानव तस्करी करत नाही तोपर्यंत त्यात वावगं काहीच नाही असं तिने म्हटलंय. सोमी अलीने अभिनय सोडला असून ती मानवतावादी दृष्टीकोण घेऊन हल्ली समाजात वावरत असते, तिने ‘नो मोअर टिअर्स’ नावाची समाजसेवी संस्थाही सुरू केली आहे. सोमी अलीचं म्हणणं आहे की आपण सेक्स शिक्षणाबाबत गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे.

शेकडो फिल्म बनवून कोटय़वधी कमावले

राज कुंद्रा याने त्याच्या सहकाऱयांच्या मदतीने शंभरहून अधिक पॉर्न फिल्म बनवल्या होत्या असं पोलिसांना कळालं आहे. त्यातून कोटय़वधीची कमाई करणाऱ्या कुंद्राने अनेक फिल्म डिलिट केल्या आहेत. त्या डिलिट केलेल्या फिल्म पुन्हा रिट्राइव्ह करीत आहोत. चित्रपटात नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणींना हेरून त्यांच्या पॉर्न फिल्म बनविणारा राज कुंद्रा याला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली होती. कुंद्राने त्याचा लंडनस्थित भावोजी आणि पॉर्न फिल्म प्रकरणातला वॉण्टेड आरोपी प्रदीप बक्षी याच्या मदतीने शेकडो पॉर्न फिल्म ‘हॉटशॉट’ अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्यात. या अश्लील उद्योगातून कुंद्राने रग्गड पैसा कमावला. राज कुंद्राने ज्या पॉर्न फिल्म डिलिट केल्यात त्या आम्ही पुन्हा मिळविण्याचा सायबरतज्ञांच्या मदतीने प्रयत्न करीत आहोत, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या