पबजीचं वेड संपेना, वडिलांनी खेळण्यापासून रोखल्याने मुलाकडून चाकूने वार

उत्‍तर प्रदेशात एका मुलाने वडिलांवर चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. केवळ पबजी खेळण्यापासून रोखल्याने मुलाने वडिलांवर चाकू चालवला. इतकंच नाही तर नंतर स्वत:वर देखील वार केले.

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील ही घटना आहे. पबजी खरंतर देशात बॅन आहे. मात्र असे असतानाही आधीच गेम डाऊनलोड केलेली मंडळी अजूनही यातून बाहेर येत नाहीत. पबजीचं वेड अजूनही कमी झालेलं नाही. मेरठ मधील या मुलाला वडिलांनी पब्जी खेळण्यापासून रोखलं असता तो संतापला. त्याने जवळच असलेला चाकू उचलला आणि वडिल्याच्या मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. त्यानंतर इतरांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला असता त्याने स्वत:वर देखील हल्ला केला. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पबजी खेळत असल्यापासून मुलाचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे लोकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या