दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बापाने मुलग्याचा डोक्यात कोयता घातला

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बापाने मुलग्याच्या डोक्यावर कोयतीने प्रहार केल्याने मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना संगमेश्वर येथील मेढे तर्फे फुणगुस गोताडवाडी येथे घडली.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश धालु गोताड यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यांनी मुलगा दिवेश रमेश गोताड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी दिवेशने पैसे देण्यास नकार दिला आणि तुम्ही घरात चला असे सांगितले. त्यावेळी दोघेही घरात गेले.

मात्र पैसे न दिल्याने वडील रमेश यांना राग येऊन त्यांनी घरात जाऊन घरातील कोयता आणला आणि मुलाच्या डोक्यावर वार केले. यामध्ये दिवेश जखमी झालेला आहे. दिवेश याला संगमेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवेश यांच्या तक्रारीवरून वडील रमेश यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आपली प्रतिक्रिया द्या