दारूच्या नशेत जावयाकडून सासुचा खून

राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वसंतराव नाईक नगरात जावयाने सासुचा खून केल्याची घटना शनिवारी घडली. अमित सडमाके नामक तरूणाने शुक्रवारी रात्री 10 वाजता पत्नीसोबत दारूच्या नशेत वाद घालून तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला.

हा वाद बराच वेळ चालल्यानंतर अमितच्या सासुने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रागाच्या भरात जावयाने सासुवर लोखंडी रॉडने प्रहार केले. यात सासु कलावती जानराव मेश्राम गंभीर जखमी झाली. तिला दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी जावयाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या