संतापजनक! दारूसाठी मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड़ घालून केला खून

735
प्रातिनिधीक फोटो

दारूसाठी जन्मदात्या आईचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री मेहकर मधील अंजनी खुर्द येथे घडली आहे. कमलबाई आत्माराम अवसरमोल (65) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील कमलबाई या शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घरासमोरील अंगणात बसल्या होत्या. यावेळी मुलगा विनोद अवसरमोल हा दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करू लागला. आईने नकार देताच शिवीगाळ करीत भांडण केले व घरात जाऊन कुऱ्हाड आणून आईच्या डोक्यात घातली. त्यामुळे आई गंभीर जखमी होऊन जागीच पडली. मोठा मुलगा दिपक व नातेवाईक यांनी तात्काळ मेहकर येथे आणले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दिपकने रविवारी पहाटे मेहकर स्थानकात फिर्याद दिली. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, पोलीस उपनिरीक्षक रवी हुंडेकर,पो.काँ.गणेश लोढे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या