हुक्काबारमध्ये गेलेल्या मुलाला पकडण्यासाठी वडिलांनी बोलावले पोलीस

23

सामना ऑनलाईन । गाझियाबाद

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मित्रांसोबत हुक्का बारमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांनी पोलिसांच्या हवाली केलं आहे. हा मुलगा क्लासला दांडी मारून मौजमजा करण्यासाठी हुक्काबारमध्ये मित्रांसोबत गेला होता. याची माहिती त्याच्या वडिलांना मिळताच त्यांनी १०० नंबरवर फोन करून याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व मुलांना ताब्यात घेतलं. दरम्यान तासभर हुक्काबारमध्ये गोंधळ सुरू होता.

हुक्काबारच्या मॅनेजरने मुलाच्या वडिलांची समजूत घालण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र ते ऐकण्यास तयार नव्हते. आपला मुलागा क्लासला येत नसल्याची माहिती शिक्षकांनी या मुलाच्या वडिलांना दिली होती. त्यांनी मुलाचा पाठलाग केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलाला मित्रांसोबत हुक्काबारमध्ये रंगेहात पकडलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी हुक्का मिळाला आहे मात्र कोणतेही अमली पदार्थ तेथे मिळाले नाही. पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं असून सर्व हुक्का बारला अल्पवयीन मुलांना प्रवेश न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या