अनेकांना हवी आहे माझ्यासारखी सून, अभिनेत्रीचा दावा

1815

सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू झाली आहे. अर्थात यंदा गेल्या वर्षीप्रमाणे सेलिब्रिटींचे लग्नसोहळे नसले तरी अनेक लग्नांच्या चर्चा सुरू आहेत. त्यात रणबीर-आलिया, मलाईका-अर्जुन कपूर, तापसी पन्नू असे अनेक कलाकार या चर्चेत अगदी रांगेत आहेत. या सगळ्यात आता अजून एका अभिनेत्रीची चर्चा सुरू झाली आहे.

अर्थात ही चर्चा तिच्या लग्नावरून रंगलेली नसून तिच्या आगामी चित्रपटावरून रंगली आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून सोनाक्षी सिन्हा आहे. तिचा दबंग 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. दबंगच्या आधीच्या दोन्ही भागात आणि याही भागात ती रज्जो ही भूमिका करत आहे. थप्पडसे डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है, हा तिचा संवाद अनेकांच्या लक्षात असेलच. रज्जोविषयी बोलताना सोनाक्षीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातलीही काही गुपितं उघड केली आहेत.

sonakshi-as-rajjo

एका वृत्तपत्राला दिलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षीने रज्जोविषयीच्या तिच्या आठवणी एका मुलाखतीत उलगडल्या. तिला रज्जोच्या रुपात पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना तिच्याचसारखी सून हवी असल्याच्या प्रतिक्रिया तिला मिळाल्याचं तिने सांगितलं आहे. मी बरीचशी रज्जोसारखीच आहे. एकाच चित्रपटाच्या तीन भागात एकच व्यक्तिरेखा असणं ही गोष्ट प्रथमच बॉलिवूडमध्ये घडत असल्याने रज्जो ही व्यक्तिरेखा आपल्या मनाच्या खूप जवळची असल्याचं तिने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या