प्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….

सामना ऑनलाईन, मुंबई

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या रिलेशनबाबत गेले काही महिन्यांपासून अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सोनाली कुलकर्णीने तिच्या प्रियकराबाबत पहिल्यांदाच मौन सोडलं असून तिच्याबाबत पसरणाऱ्या अफवांबाबत तिने संताप व्यक्त केला आहे.  “माझ्या प्रेमसंबंधाबाबत आणि विवाहाच्या अफवा पसरवणाऱ्या लोकांबद्दल मला राग येतो, जेव्हा माझ्या लग्न ठरेल तेव्हा मी ही महत्वाची बाब लोकांपासून का लपवेन?” असा प्रश्न सोनालीने विचारला आहे.

सोनाली कुलकर्णीने ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं आहे. ‘प्रेमात पडणं ही बाब नैसर्गिक आहे, आणि मला ती मान्य करण्यात काहीच संकोच वाटत नाही. मी रिलेशनशिपमध्ये आहे’ असं सोनाली कुलकर्णीने म्हटले आहे. मात्र ती कोणाच्या प्रेमात पडली आहे याबाबत मात्र तिने काहीही सांगण्यास नकार दिला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितलं की ‘तो’ चित्रपटसृष्टीमधला नाहीये.’

मराठी चित्रपटसृष्टीतले बहुतांश पुरुष कलाकार हे लग्न झालेले आहेत, किंवा त्यांचे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत असं म्हणणाऱ्या सोनाली कुलकर्णीने तिचा प्रियकर कोण हे सांगणं जाणीवपूर्वक टाळलं आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी प्रियकराचं नाव जाहीर करेन असं ती म्हणाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या