कर्करोगानंतर पतीमध्ये बदल झालाय, सोनाली बेंद्रेची भावूक पोस्ट व्हायरल

3133

बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे हिला कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. यानंतर तिने अमेरिकेत जावून यावर योग्य उपचार घेतले आणि आता ती पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. अमेरिकेत उपचार सुरू असतानाही ती सोशल मीडियावर सक्रीय होती आणि चाहत्यांना अपडेट देत होती. आता कॅन्सरवर मात केल्यानंतर तिने पतीबाबत एक भावूक पोस्ट लिहिली असून सोशल मीडियावर ती वेगाने व्हायरल होत आहे.

सोनाली बेंद्रे आणि पतनी गोल्डी बहेल यांच्या लग्नाला नुकतेच 18 वर्ष पूर्ण झाले. याच अनुषंगाने तिने इन्स्टाग्रामवर पतीसोबतचा फोटो शेअर केला आणि भावूक पोस्ट लिहिली. यात तिने म्हटले की, गेल्या वर्षी याचदिवशी आम्ही न्यूयॉर्कच्या रुग्णालयात होतो. जेव्हा मला कर्करोग झाल्याचे समजले तेव्हा बेंद्रे आणि बहेल या दोन्ही कुटुंबामध्ये बदल झाले. त्या बदलाने कर्करोगापूर्वीचे आणि कर्करोगानंतरचे कुटुंब अशी त्यांची विभागणी झाली. कॅन्सरच्या आठवणी बाजूला ठेवून आयुष्याकडे सकारात्मक पाहण्याचे मी ठरवले आहे. ज्यामुळे मनाला आनंद होईल ते करायचे आणि नवे शिकून घ्यायचे ठरवले आहे.

sonali

ती पुढे म्हणाली की, ‘गोल्डीसोबत लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एक ट्रिप काढायचा प्लॅन झाला. मला कर्करोग होण्यापूर्वी जर मी त्याला ट्रिपसाठी चल म्हटले असते तर तो तयार झाला नसता पण आता तो बदलला आहे. तो ट्रिपसाठी तयार झाला आणि त्याच्यात झालेला बदल चांगला आहे. मला तो बदल आवडला. मी आजारी असताना त्यानं सर्वकाही बाजूला ठेवून मला प्राधान्य दिलं. आता त्याला प्राधान्य द्यायची वेळ आहे.’ तसेच पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोनाली म्हणते की, ‘तू कल्पनाही करणार नाहीस एवढे माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला आधार दिलास आणि माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिलास त्याबद्दल खूप आभार, गोल्डी तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’


View this post on Instagram

This day, last year… we were in New York at the hospital. Since then, the Bendre-Behls have identified two time periods – B.C. (Before Cancer) and A.C. (After Cancer). Lately, my motto has been to move on & keep trying new things, and detoxing and rejuvenating is on top of the list. So on the occasion of our 17th wedding anniversary, I thought let’s take a break and go on a road trip to @atmantan. Before Cancer, Goldie would have never agreed to something like this but I love how he’s changed He has put everything on standby and has been focusing so much on me… and now I’m turning the focus back on him. P.S. Happy Anniversary @goldiebehl, I love you more than you could imagine… thank you for being my pillar of strength in health & sickness… literally!

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

आपली प्रतिक्रिया द्या