रणवीर-दीपिकाचं लग्न ‘कन्फर्म’, ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

11

सामना ऑनलाईन । मुंबई

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगत आहेत. बॉलिवूडमध्ये लगीनसराईचा मोसम आल्यामुळे अनुष्का, सोनमनंतर आता दीपिकावर अनेकांचं लक्ष केंद्रित झालं आहे. रणवीर आणि दीपिकाचं लग्न होणार का या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे, कारण एका अभिनेत्रीने नुकताच त्याचा खुलासा केला आहे.

ही अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. ८ मे रोजी आनंद आहुजासोबत विवाहबद्ध झालेल्या सोनमने लग्नानंतर लगेचच कान्स महोत्सवात हजेरी लावली होती. तिथे माध्यमांनी तिला विचारलेल्या प्रश्नांवर सोनमने जे उत्तर दिलं, त्यावरून रणवीर-दीपिकाच्या नात्याचा खुलासा झाला आहे. सोनम म्हणाली की, मला आशा आहे की लवकरच त्या दोघांचं लग्न व्हावं. आमचं सगळं कुटुंब रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची वाट पाहत आहोत.’

sonam-kapoor-new

सोनमच्या या विधानामुळे रणवीर आणि दीपिकाचं लग्नं ही नुसतीच वाऱ्यावरची वार्ता नसून त्यात काहीतरी तथ्य असल्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या कुटुंबाने त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. दीपिकाची आई आणि बहीण तिच्यासाठी दागिन्यांची खरेदी करण्यात व्यग्र असल्याचंही समजत होतं. म्हणूनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून त्या दोघांकडून या गोष्टीची अधिकृत घोषणा होण्याची ते वाट पाहत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या