Uber नं प्रवास टाळा! ड्रायव्हरच्या भयंकर वागण्यानंतर सोनम कपूरचा सल्ला

5168
sonam-kapoor

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर एका घटनेनंतर चांगलीच हादरली आहे. लंडनमध्ये उबर कॅबचा तिला भयंकर अनुभव आला असून प्रवाशांनी कॅबनं प्रवास करणं टाळून सार्वजनिक वाहनानं प्रवास करणं अधिक सुरक्षित असल्याचा सल्ला तिनं आपल्या ट्विटर हँडलवरून दिला आहे.

सोनम सध्या लंडनमध्ये असून तिथे फिरताना तिला आलेल्या विचित्र अनुभवामुळे ती चांगलीच हादरली असल्याचं तिनं आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे. लंडनमध्ये तिनं उबर सर्व्हिस वापरली. त्यावेळी तिला विचित्र अनुभव आला. ‘ आपल्या अनुभवावरून मी सांगते की लंडनमध्ये उबर सारखी कॅब सेवा वापरण्या ऐवजी तिथल्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करा. कॅबमध्ये आलेल्या अनुभवामुळे मी चांगलीच हादरली आहे’, असं तिनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तिच्या या ट्वीटनंतर तिचे चाहते, नातेवाई, मित्रमंडळी यांनी विचरणा करण्यास सुरुवात केली. अखेर एका युझरने सोनमला विनंती केली की, ‘ सोनम तुला काय अनुभव आला. लंडनमध्ये मी कॅब अनेकदा वापरतो, त्यामुळे काय घडलं हे जाणून घेतल्यास मला मदतच होईल’. या ट्वीटवर सोनमने प्रतिक्रिया दिली. गाडीचा ड्रायव्हर तिच्याशी अत्यंत विचित्र वागला होता.
‘गाडीतून प्रवास करत असताना गाडीच्या ड्रायव्हरची मानसिक स्थिती मला योग्य वाटत नव्हती तो माझ्यावर खेकसत होता. त्यामुळे मी हादरली’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सोनमच्या या ट्वीटवर उबरने देखील प्रतिक्रिया दिली आहे. उबरच्या ग्लोबल हेल्पलाईन अकाउंटवरून ग्राहकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठीची लिंक शेअर केली आहे, जिथे ग्राहक थेट तक्रार नोंदवू शकतात. अर्थात सोनमने या ट्वीटवर सकाळपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.

सध्या सोनमला प्रवास करताना मात्र विचित्र अनुभव येत असल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी ब्रिटीश एअरवेजमधून प्रवास करताना सोनमच्या बॅग्स हरवल्या होत्या. हा अनुभव तिला दोनदा आला. अखेर आता ब्रिटीश एअरवेजने प्रवास करणार नाही असं तिनं ट्विटरवरून जाहीर करून टाकलं होतं. आता उबर कॅबचा फटकाही तिला बसला आहे. तिचे चाहते यासंदर्भात तिची विचारपूस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या