सरसंघचालकांच्या विधानावर सोनम कपूरची टीका, नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

1068
sonam-kapoor

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटस्फोटासंदर्भात केलेल्या एका विधानावरून सध्या वाद सुरू आहे. विरोधक सरसंघचालक भागवत यांच्या विधानाचा आधार घेत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत आहेत. राजकीय धोरण, समाजात घडणाऱ्या घटना, यासंदर्भात थेट वक्तव्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने या वादातही उडी घेतली आहे. शिक्षित लोकांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण अधिक असल्याचे मोहन भागवत म्हणाले होते. मात्र सरसंघचालकांच्या विधानाला लक्ष्य करताना सोनमनेही वादग्रस्त टीका केली आहे.

सोनम कपूरने ट्ववीट करू मोहन भागवत यांच्या विधानाची निंदा केली आहे. सोनमने लिहिले आहे की, ‘समजदार व्यक्ती अशी भाषा बोलतो का? मागसलेले मूर्खपणाचे विधान’. सोनम कपूरच्या या ट्वीट वर देखील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. अनेकांनी सोनमच्या या विधानाला चुकीचे म्हणत तिच्यावर हल्लोबोल करत मोहन भागवत यांचे विधान योग्य असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी सोनमची बाजू घेत सरसंघचालकांना लक्ष्य केले आहे.

घटस्फोटांसंदर्भात मोहन भागवत काय म्हणाले होते?

मोहन भागवत म्हणाले होते की, सध्या समाजात घटस्फोटांची संख्या वाढलेली दिसत आहे. संमृद्ध आणि शिक्षित कुटुंबांमध्ये घटस्फोट जास्त होत आहेत. शिक्षणा आणि संमृद्धता यामुळे व्यक्तीमध्ये अहंकार निर्माण होत आहे. त्यामुळे कुटुंबात ऐक्य न राहता वाद निर्माण होतात आणि कुटुंब तुटतात. हिंदुस्थानात हिंदू समाजाला पर्याय नाहीच, असे मोहन भागवत म्हणाले होते.

सोनम कपूर ही अभिनेत्री असली तरी ती राजकारण, समाजकारण याविषयी आपली मते मांडण्यास कधी मागेपुढे पाहत नाही. यामुळे ती अनेकदा वादातही अडकली आहे. दिल्लीत ‘आप’च्या विजयानंतर लेखक चेतन भगतने आप संदर्भात केलेल्या विधानावर तिने प्रतिक्रिया दिली होती. दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाल्याचे त्यावेळी पाहायला मिळाले होते.

तिच्या करिअरकडे लक्ष्य दिल्यास गेल्या वेळी तिचा ‘एक लडकी को देखा तो’ हा चित्रपट फारसा चालला नाही. त्या चित्रपटात तिने समलैंगिक लग्नपद्धतीचे समर्थन करणारा विषय मांडला होता. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, सध्याचा आघाडीचा अभिनेता राजकुमार राव हे देखील होते. मात्र बोल्ड विषयाला प्रेक्षकांनी फारशी साथ दिलेली दिसली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या