बॉलिवूड अभिनेत्री व सोनम कपूर आणि तिची बहिण डिझायनर रिया कपूर दोघींनी मिळून मसाबा गुप्तासाठी खास बेबी शॉवरचे आयोजन केले होते. या फंक्शनमध्ये सोनमने मसाबाने डिझाइन केलेली साडी नेसली होती. या साडीवर तिने अनोखा ब्लाउज घातला होता.
मसाबा गुप्ता लवकरच आई होणार असून तिच्या बेबी शॉवरसाठी सोनमने मसाबा कलेक्शनमधली साडी नेसली होती आणि त्यावर तिने कोरीयन फॅशन डिझायनर रेजिना प्योच्या कलेक्शनमधील ब्लाउज घातला होता.
साडीचा पदर आणि काठाला स्कॅलोप्ड क्रोशेटचे भरतकाम केलेले आहे. ही साडी सोनमने गुजराती पद्धतीत नेसली होती.
तिच्या या साडीवर तिने फुलांची डिझाईन असलेले झुमके कानात घातले होते. तर केसांचा आंबोडा बांधला होता, हातामध्ये क्रोशेटचे मिनी क्लच होते. सोनमने कमीत कमी अॅक्सेसरीजमध्ये हा लूक पूर्ण केला.