लडाखला राज्य दर्जा मिळावा या व अन्य मागण्यांसाठी जंतर मंतर येथे उपोषण करण्याची परवानगी नाकारल्यानंतर रविवारी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि इतर आंदोलकांनी लडाख भवन येथे उपोषण सुरू केले. वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली एक महिन्यापूर्वी लेहमधून आंदोलकांनी ‘दिल्ली चलो पदयात्रा’ काढली होती. यापैकी बहुतेक आंदोलक लडाखला परतले असून उर्वरित आंदोलक उपोषणात सहभागी झाले आहेत.