सोनियांचा भाजपला धक्का, हार्दिक पटेल गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी

1647
hardik patel

पटेल पाटीदार समाजाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कडवे टीकाकार हार्दिक पटेल यांची गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती करत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. पाटीदार समाजाच्या आरक्षणावरून र्हािदक यांनी गुजरातमध्ये रान पेटवले होते. आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवून काँग्रेसने मोदी-शहा जोडीची राजकीय कोंडी करण्याची खेळी केली आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशाने काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी एका पत्रकाद्वारे र्हािदक पटेल यांची गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी र्हािदक पटेल यांनी मोठे आंदोलन केले होते. त्याचा राग मनात बाळगून भाजप सरकारने त्यांच्याविरोधात वैयक्तिक पातळीवर जाऊन गुन्हेही दाखल केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी र्हािदक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर संपूर्ण राज्याचाही त्यांनी दौरा केला होता. आता काँग्रेसने त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित छावडा आणि विधानसभेतील काँग्रेसचे नेते परेश डनानी यांच्या सोबतीने पटेल आता काम करतील. र्हािदक पटेल यांना महत्त्वाची जबाबदारी दिल्याने पाटीदार समाजात काँग्रेसबद्दल फीलगुड निर्माण होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. शिवाय नरेंद्र मोदी व अमित शहा यांना गुजरातमध्येच अडकवून ठेवण्याचीही क्षमता र्हािदक पटेल यांच्याकडे असल्याने त्याचाही काँग्रेसला भविष्यात फायदा होण्याची चिन्हे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या