सोनिया गांधी तापाने आजारी; रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या तापाने फणफणल्या असून त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात रुग्णालयाने एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे.

सोनिया गांधी या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे आणि त्यांच्या चाचण्या सुरू आहेत, तसेच प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.

सोनिया गांधींना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर वरिष्ठ सल्लागार डॉ अरुप बसू आणि टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.