मोदी सरकारने लसीकरणावरून हात झटकले, सोनिया गांधी यांची टीका

आज काँग्रेस पक्षाची बैठक पार पाडली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्य अध्यक्षतेखाली ही बैठक पार पाडली. मोदी सरकारने लसीकरणावरून हात झटकले अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी देशातील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच मोदी सरकारने लसीकरणावरून हात वर केले अशी टीका करून सोनिया गांधी यांनी संपूर्ण देशात मोफत लसीकरण करावे अशी मागणी केली आहे. कोरोना संकट काळात प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली, लसीकरणात काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे अशी ग्वाहीही त्यानी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या