‘क्रेडिट टू क्रिएटर्स’मधून अज्ञात संगीतकारांना नवी ओळख

484

बॉलीवूडमधील संगीत जगतातील कलाकारांनी ’क्रेडिट टू क्रिएटर्स’ हे नवीन कॅम्पेन सुरू केले आहे. याद्वारे इंडस्ट्रीतील अज्ञात संगीतकारांना नवी ओळख मिळणार आहे. नुकतेच गायक सोनू निगमने एक व्हिडीओ शेयर करत संगीतकार रामलाल चौधरी यांच्याविषयी लोकांना सांगितले आहे.

सोशल मीडियाकर व्हिडीओ शेयर करत सोनू म्हणाला, अनेकदा आपण गाणी ऐकतो. पण ते गाणे कुणी लिहिले, कुणी गायले, त्याचे संगीतकार कोण हे आपल्याला माहीत नसते. त्यासाठी हे कॅम्पेन सुरू केले आहे. सोनूने ’सेहरा’ चित्रपटातील ’तकदीर का फसाना जाकर किसे सुनाए’ या आपल्या आकडत्या गाण्याचे संगीतकार रामलाल चौधरी यांच्याविषयी लोकांना सांगितले आहे.

रामलाल चौधरी हे 1944 साली मुंबईत आले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी पृथ्की थिएटरमध्ये संगीतकार राम गांगुली यांचा सहाय्यक म्हणून काम केले. 1948 साली राज कपूर यांच्या पदार्पणातील ’आग’ या चित्रपटात रामलाल यांनी सनई आणि बासुरीवादन केले होते. ‘टांगावाला’, ‘सेहरा’, ‘गीत गाया पत्थरेंने’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या