सोनी आणणार मोशन-आय कॅमेरा आणि फोरके एचडी डिस्प्लेवाला मोबाईल

सामना ऑनलाईन,बार्सिलोना

जागतिक मोबाईल बाजारपेठेमध्ये सॅमसंगने आणि आयफोनने चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. त्यांच्या वर्चस्वाला हादरे देण्यासाठी अनेक मोबाईल कंपन्या प्रयत्न करतायत, त्यासाठी वेगवेगळी फिचर्स आणण्याचा प्रयत्न होतोय किंवा कॅमेरा आणि मोबाईल डिस्प्ले अजून आकर्षक आणि जास्त क्षमतेचे करण्याचा प्रयत्न केला जातोय. सोनी एक्स्पिरियाने हा प्रयोग करून बघितला आहे आणि त्यामध्ये आणखी भर घालण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.

experia-xz-primium
फोटो सौजन्य-युट्यूब

बार्सिलोना इथे सुरू असलेल्या जागतिक मोबाईल काँग्रेसम मध्ये सोनीने एक्स्पिरीया एक्सझी प्रिमियम हा मोबाईल लाँच केलाय जो बाजारपेठेमध्ये याच वर्षी आणण्यात येणार आहे. या मोबाईलची खासियत ही आहे की या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यासाठी स्टॅक्ड मेमरी दिली आहे, ज्यामुळे ९६० फ्रेम पर सेकंद इतक्या वेगाने चित्र किंवा व्हिडीओ टिपता येतील,टीपलेल्या फोटोंमधील सर्वोत्तम फोटो कोणता आहे तो देखील मोबाईल तुम्हाला दाखवेल. एखादी असामान्य घटना तुमच्या आजूबाजूला घडत असेल तर त्या घटनेचं स्लो मोशनमध्ये चित्रीकरण करणं या मोबाईलमुळे शक्य होईल. डिस्प्ले बाबत बोलायचं झालं तर सोनी ब्राव्हिया टीव्हीमध्ये जी पिक्चर क्वालिटी बघायला मिळते तशीच क्वालिटी मोबाईलमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोबाईलमध्ये फोरके एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामुळे चित्र अधिक स्पष्ट दिसतात आणि रंगही अधिक उठावदार आणि सुंदर दिसतात.

new-experia-xz-primium
फोटो सौजन्य-युट्यूब

फोनच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर फोन हा मेटॅलिक फिनिशचा मोबाईल आहे, इतर एक्स्पिरियाच्या मोबाईलप्रमाणेच दिसायला वाटू शकेल मात्र फोनच्या मेटल बॉडीमुळे तो थोडा उठून दिसतोय.