कपिलला सोनीचा दणका, रविवारी शो नाही..

36

सामना ऑनलाईन । मुंबई

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातल्या भांडणाचा फटका कपिला आता चांगलाच बसला आहे. नुकताच कपिल शर्माला सोनी टीव्हीने मोठा दणका दिला आहे. येत्या रविवारीच्या प्राईम टाईममधून कपिल शर्माचा शो वगळण्यात आला आहे. त्या जागी सुनील ग्रोव्हरचा सुपरनाईट विथ ट्युबलाईट हा शो दाखवण्यात येणार आहे.

सोनी टीव्हीवर सध्या सुनीलच्या या नवीन कार्यक्रमाच्या जाहिराती झळकत असून येत्या रविवारी हा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे. अभिनेता सलमान खानचा सिनेमा ‘ट्युबलाईट’च्या प्रमोशनसाठी या शोचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा दोन तासांचा महाएपिसोड असणार आहे. या शोमध्ये सलमानसोबत अरबाज खानही दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या