सूरज पांचोली आणि सुशांत सिंह राजपूतमध्ये वैर होतं ? स्वत: सूरजनेच दिले उत्तर

2226

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलीवूड हादरलं होतं. या आत्महत्येप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करण्यापूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियन हिनेही आत्महत्या केली होती. या दोघांच्या आत्महत्येमध्ये अभिनेता सूरज पांचोली याचा हात असल्याचा आरोप केला जात होता. सूरज पांचोली आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यात वैर असल्याचेही आरोप केले जात होते. 13 जूनला सूरजने पार्टी ठेवली होती. या पार्टीला सुशांतही आला होता. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी सुशांतने आत्महत्या केल्याने सूरज पांचोलीवर आरोप केले जाऊ लागले. या आरोपांबाबत सूरज पांचोलीने मौन सोडलं आहे.

सूरजने सांगितलं की तो सुशांतला 1-2 वेळाच भेटला होता. दोघांमध्ये फार बोलाचालीही झाली नव्हती. असं असलं तरी आम्हा दोघांमध्ये कोणतीही कटुता नव्हती आणि आमच्यातील संबंध हे अत्यंत सामान्य होते असं सूरजने सांगितलं आहे. आमच्यात वैर असण्याचं कारणच नव्हतं असं त्याने पुढे सांगितलं आहे. सुशांत मला लहान भाऊ म्हणून बोलवायचा आणि तो माझा सन्मानही करायचा. बॉलीवूडमधील वरिष्ठ या नात्याने मी देखील त्याचा सन्मान करत होतो असं सूरजने सांगितलं आहे.

सूरजने सांगितलं की त्याची आणि सुशांतची पहिली भेट ही अभिनयाच्या कार्यशाळेत झाली होती. यानंतर सुशांत हा मोठा अभिनेता बनला होता. एका मित्राच्या घरी भेटल्यानंतर आमच्यात चांगली मैत्री झाली होती असं तो म्हणाला. सुशांत याने मला राबता चित्रपटाच्या स्क्रिनींगलाही बोलावलं होतं असंही सूरजने सांगितलं आहे.

सूरजला प्रश्न विचारण्यात आला होता की सुशांतसोबत नेपोटिझमचा प्रकार घडला होता का यावर तो बोलला की त्याच्यासोबत गटबाजी किंवा अन्य वाईट प्रकार होत होते का याबाबत त्याला माहिती नाहीये. दिशा सालियनसोबत आपले कोणतेही संबंध नव्हते असंही त्याने सांगितलं. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून होत असलेल्या आरोपातही काही तथ्य नसल्याचं सूरजने सांगितलं. आजतकच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या