अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ व रणवीरच्या ’83’ चित्रपटाबाबत मोठा निर्णय

1514

अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट लवकरच डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटासोबतच अनेक बडे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. असे असतानाच अक्षय कुमारचा सूर्यवंशी व रणवीर सिंगच्या 83 बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हे चित्रपट चित्रपट गृहातच रिलीज होणार असल्याचे समोर आले आहे.

अनलॉक 1 च्या पहिल्या टप्प्यात चित्रपट गृहांना परवानगी देण्यात आली नव्हती. दुसऱ्या टप्प्यात परवानगी मिळेल अशी आशा असतानाच यावेळी चित्रपटगृह मालकांची निराशा झाली आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यातील सणासुदीच्या काळापर्यंत देशातील परिस्थिती सुधारून चित्रपटगृहांना देखील परवानगी मिळेल अशी आशा चित्रपटगृहाच्या मालकांना असल्याने अक्षय कुमारचा सूर्यवंशी व रणवीर सिंगचा 83 हा चित्रपट थिएटरमध्येच रिलीज होणार असल्याचे समोर आले आहे. पीव्हिआर सिनेमाजने या बाबात ट्विट करून माहिती दिली आहे.

लक्ष्मी बॉम्ब, भुज, दिल बेचारा, बिग बुल, सडक २, खुदा हाफिज, लुटकेस हे सात चित्रपट येत्या काही दिवसात डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या