महिलेला एका महिन्यात 2 वेळा झाली गर्भधारणा, कारण ऐकून आश्चर्यचकीत व्हाल

एखादी महिला कधी महिन्यातून दोन वेळा गर्भवती राहिली आहे, असं तु्म्ही कधी ऐकलं नाआहे का ? नाही ना, पण इंग्लंडमध्ये अशी एक घटना उघडकीस आली आहे.

द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील लिओमिन्स्टर येथे राहणाऱ्या सोफी स्मॉल (30) या महिलेला एका गर्भधारणेनंतर नवीन गर्भधारणा झाली. याविषयी सोफी सांगते की, मला माहित होते की, मी गर्भवती आहे, कारण मला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता, पण गर्भधारणा झाली आहे, याची मला खात्री वाटत नव्हती म्हणून आम्ही प्रयत्न करत राहिलो.

या घटनेला वैद्यकीय भाषेत सुपरफेटेशन असे म्हणतात. अशा घटना ज्या महिलांना आयव्हीएफ म्हणजेच विट्रो फर्टिलायझेशन केले आहे, त्यांच्या बाबतीत घडू शकतात. गर्भधारणेदरम्यान जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्यांदा गर्भवती होते तेव्हा या स्थितीला सुपरफेटेशन म्हणतात. पहिली गर्भधारणा सुरू झाल्यानंतर किंवा सुमारे 1 महिन्यानंतर, जेव्हा स्पर्म शुक्राणूंच्या संपर्कात येतात तेव्हा ते फलित होते.यामुळे जुळ्या मुलांचा जन्म अनेकदा सुपरफेटेशनमधून होतो.आणखी एक नवीन गर्भधारणा सुरू होते.ते अनेकदा एकत्र किंवा एकाच दिवशी जन्माला येतात.

सोफी स्मॉल चार आठवड्यांच्या अंतराने दोन वेळा गर्भवती राहिली. आता तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. सोनोग्राफीमध्ये असे दिसून आले की डार्सी आणि हॉली ही दोन बाळे गर्भात वेगवेगळ्या आकाराची होती. अशी प्रकरणे काही प्रमाणात अपवादात्मक किंवा दुर्मिळ मानली जातात.

गर्भातील या गर्भांचे गर्भधारणेचे वय वेगळे असू शकते. याचा अर्थ दोन्ही मुलांचा विकास वेगवेगळ्या टप्प्यांवर होत असतो. ही जुळी मुले सामान्य जुळ्या मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळी असतात.

सोफी सांगते की, जेव्हा मी डार्सीला जन्म देत होते तेव्हा मला खूपच समस्या होत्या.मला सात आठवड्यात आठ वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 120 तास उपचार सुरू होते. पुढे ती म्हणते की, हे मला माहित नव्हते की, दोन्ही बाळांसह गर्भवती असून ती वेगवेगळ्या आकाराची आहेत.

मुलींच्या वाढीमध्ये जन्माच्या वेळी 35 टक्के फरक होता आणि गर्भात चार आठवड्यांच्या अंतराने त्यांचा विकास झाला. सोफीने असेही सांगितले की, जेव्हा लोकं तिच्या गर्भधारणेविषयी ऐकतात तेव्हा त्यांना फारच आश्चर्य वाटते.

पुढे ती सांगते की, मी इतकी आजारी होते की, 7व्या आठवड्यात सोनोग्राफी केल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, हे थोडे वेगळे असून मला जुळी मुले होणार आहेत, पण ती एक बाळ दुसऱ्या बाळापेक्षा वयाने मोठे होते. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की, दोन्ही बाळांना स्वतंत्र प्लेसेंटा आहे जेणेकरून त्यांना पाहिजे तेव्हा ते खायला देऊ शकतील. पण एक जुळे दुसऱ्यापेक्षा मोठे का होते हे त्यांना समजू शकले नाही.