त्रिफळाचित झाला तरी घेतली डीआरएसची मदत

26

सामना ऑनलाईन । गॅले

क्रिकेटच्या सामन्यात पायचित किंवा झेलबाद देण्यात आल्यानंतर फलंदाजाला डीआरएस प्रणालीचा (तिसरा पंच) वापर केल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र क्रिकेटमध्ये त्रिफळाचित (बोल्ड) झाल्यावर डीआरएस प्रणाली वापरली असं आज पर्यत ऐकलं नाही. मात्र बांगलादेशच्या या खेळाडूनं हा पराक्रम केला आणि स्वत:चंच हसं करून घेतलं आहे. या खेळाडूचं नाव आहे सौम्य सरकार. श्रीलंकेचा फिरकीपटू गुणरत्नेच्या गोलंदाजीवर सोम्य सरकार त्रिफळाचित झाला. सौम्य सरकारनं याविरोधात डीआरएसचा इशारा करताच खेळाडू, पंच आणि प्रेक्षकही आवाक झाले.

काय आहे घटना?

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ही घटना घडली आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी घडलेली ही घटना ऐतिहासिक अशीच म्हणावी लागेल. गॅले कसोटीच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेचा गुणरत्ने गोलंदाजी करत असताना सौम्य सरकार त्रिफळाचित झाला. सौम्य सरकारला पंचांनी बाद ठरवल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी जल्लोष सुरू केला मात्र सौम्य सरकारनं डीआरएसची मदत घेण्याचा इशारा केला. सारे अचंबित झाले. अखेर त्याला बाद घोषित करण्यात आलं.

आपली प्रतिक्रिया द्या