अभिनेत्रीचं अपहरण करून बलात्कार करणाऱ्या अभिनेत्याला अटक

सामना ऑनलाईन, तिरूअनंतपुरम

फेब्रुवारी महिन्यात एका अभिनेत्रीचा त्रिचूर इथे पाठलाग करून तिचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर चालत्या गाडीतच बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका प्रसिद्ध अभिनेत्याला अटक केली आहे. दिलीप असं या अभिनेत्याचं नाव असून त्याच्याविरूद्ध सबळ पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी याबाबत बोलताना सांगितलं की दिलीपला या अभिनेत्रीच्या अपरहण-बलात्कार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात त्याची जवळपास १२ तास चौकशी करण्यात आली होती. मात्र चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं. सोमवारी त्याची पुन्हा चौकशी करण्यात आली. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली . दिलीपचा एक साथीदार आणि दिग्दर्शक-अभिनेता नादीर शाह याचीही पोलिसांनी १३ तास चौकशी केली होती. त्याच्या चौकशीत दिलीपचं नाव समोर आलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या