…अन् सौरव गांगुलीने मानले आभार

6778

प्रदूषीत वातावरणामुळे नवी दिल्लीत शुक्रवारपासून हेल्थ इमर्जन्सी घोषित केलेली होती. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही रविवारी पहिला टी-20 क्रिकेट सामना खेळल्याबद्दलबीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हिंदुस्थान व बांगलादेश या दोन्ही संघांचे आभार मानले.

गांगुलींनी ट्विटरवरून ही आभाराची पोस्टटीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा व बांगलादेश क्रिकेट बोर्डाला टॅग करून शेअर केली. दिल्लीतील प्रदूषीत हवेची गुणवत्ता एक्यूआय लेव्हल 1000 च्याही पुढे गेलेली होती. त्यामुळे हा सामना इतरत्र स्थलांतरित करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र इतक्या कमी कालावधीत सामना दुसरीकडे हलविणे शक्य नसल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले होते. प्रदूषीत हवामानामुळे दिल्लीतील शाळामहाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या