व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन; सौरभ वर्मा अंतिम फेरीत

311

हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने शनिवारी व्हिएनताम ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर 100 स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली. त्याने उपांत्य लढतीत जपानच्या मिनोरू कोगा याचा 22-20, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव केला.

जपानच्या मिनोरूने 51 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत पहिल्या  गेममध्ये द्वितीय मानांकित सौरभ वर्माला चांगली टक्कर दिली, मात्र सौरभने दुसऱ्या गेममध्ये वर्चस्व गाजवीत विजयावर शिक्कामोर्तब केले. गतवर्षी डच ओपन व कोरिया ओपनचा किताब जिंकणाऱ्या सौरभ वर्माची गाठ चीनच्या सुन फेई शिआंग याच्याशी पडणार आहे. राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्माने स्लोवेनिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही मिनोरूला हरविले होते.

लक्ष्य सेन जेतेपदापासून एक पाऊल दूर

हिंदुस्थानच्या 18 वर्षीय लक्ष्य सेनने डेन्मार्कच्या किम ब्रुनचा 21-18, 21-11 असा सहज पराभव करून बेल्जियम आंतरराष्ट्रीय चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. 48 मिनिटांपर्यंत चाललेल्या या लढतीत लक्ष्य सेनने वर्चस्व गाजविले. आता किताबी लढतीत एशियन ज्युनियर चॅम्पियन लक्ष्य सेनची गाठ द्वितीय मानांकित डेन्मार्कच्या विक्टर स्वेंडसेन याच्याशी पडणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या