हिंदुस्थान -पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबद्दल सौरव गांगुली म्हणतो…

553

टीम इंडियचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. येत्या 23 ऑक्टोबरला याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष होण्यापूर्वी गांगुलीला हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये आगामी काळात द्विपक्षीय मालिका खेळली जाणार की याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गांगुली म्हणाला की, दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका सुरू करण्याचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात केद्र सरकार आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अर्थात पाकिस्तानी सरकारच्या हातात आहे. तसेच हा प्रश्न तुम्ही मोदी आणि इम्रान खान यांना विचारायला हवा असेही तो यावेळी म्हणाला. गांगुली पुढे म्हणाला की, दोन्ही देशांमध्ये पुन्हा क्रिकेट सामने सुरू होण्यासाठी आम्हाला निश्चितच परवानगीची आवश्यकता आहे. कारण सर्व आंतरराष्ट्रीय दौरे हे सरकारच्या परवानगीने होतात. त्यामुळे या प्रश्नाचे अधिक उत्तर माझ्याकडे नाही.

हिंदुस्थान-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आयसीसी करणार विशेष लढतीचे आयोजन

2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फक्त एकदात 2012 ला दोन्ही संघात द्विपक्षीय मालिका झाली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ दोन टी-20 आणि तीन एक दिवसीय लढती खेळण्यासाठी हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला होता. त्यानंतर दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने आले आहेत.

गांगुलीचा आठवणीतील दौरा
1999 च्या कारगिल युद्धानंतर हिंदुस्थानचा संघ 2004 ला पहिल्यांदाच पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी टीम इंडियाची धुरा सौरव गांगुलीच्या हाती होती. 1989 नंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या