संघातले स्थान टिकविण्यासाठी कुणी खेळत नाही याचाच आनंद

314

हिंदुस्थानी क्रिकेट संघ वेस्ट इंडीजविरुद्धची टी-20 मालिका जिंकणार याचा मला विश्वास होता. पण संघातील प्रमुख फलंदाजांनी आपला नैसर्गिक खेळ करीत संघाला विजयी केले. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल अथवा संघातील नवोदित खेळांडूंपैकी कुणीही संघातील जागा टिकवण्याच्या हेतूने रटाळ अथवा सुरक्षात्मक फलंदाजी केली नाही याचा मोठा आनंद मला झाला आहे, अशा शब्दांत हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी टीम इंडियाच्या शानदार विजयाचे कौतुक केले आहे.

विशेष म्हणजे संघातील सर्व फलंदाज जिंकण्याच्या अपूर्व निर्धाराने मैदानात फलंदाजी करताना दिसले. ही कामगिरी निश्चितच माजी विश्वविजेत्या हिंदुस्थानी संघासाठी भूषणावहच म्हणायला हवी, अशी कौतुकाची थाप बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी टीम इंडियाच्या पाठीवर दिली.

कोणतेही भय न बाळगता प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करणे ही कामगिरी या मालिकेत विराट आणि कंपनीला चांगलीच जमलीय. संघातील स्थान टिकविण्यासाठी खेळ आपल्या कोणत्याही फलंदाजाने केला नाही.
>> सौरभ गांगुली, बीसीसीआय अध्यक्ष

आपली प्रतिक्रिया द्या