बापरे! १५१ चेंडूत ठोकल्या ४९० धावा

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. या खेळामध्ये नवा विक्रम रचला जातो आणि जुना मोडला जातो. दक्षिण आफ्रिकेच्या एका तरुण खेळाडूने ४९० धावांची खेळी करत विक्रमवीरांच्या यादीत आपल्या नावाचा समावेश करून घेतला आहे. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी आपल्या २०व्या जन्मदिवशी म्हणजेच आज (शनिवार) केली आहे.

एकही धाव न देता टिपले १० बळी

दक्षिण आफ्रिकेचा तरुण खेळाडू शेन डॅड्सवेलने १५१ चेंडूत ४९० धावांची खेळ करत क्रिकेट वर्तुळाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. डॅड्सवेलने या तुफान खेळीदरम्यान २५ चौकार आणि ५७ षटकारांचा पाऊस पाडला. शनिवारी एनडब्ल्यू पुके आणि पॉच डॉर्प संघादरम्यान झालेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. डॅड्सवेलच्या या खेळीच्या जोरावर एनडब्ल्यू पुके संघाने ५० षटकांमध्ये ३ बाद ६७७ धावांचा डोंगर उभा केला.

डावखुरा फलंदाज डॅड्सवेलने याआधी ग्यूटेंग अंडर-१५ संघाकडून खेळताना विशेष कामगिरी केलेली नाही. यष्टीरक्षक खेळाडू म्हणून खेळणाऱ्या डॅड्सवेलची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ४२ होती. मात्र आजच्या या विक्रमी खेळीमुळे तो रातोरात स्टार झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या