दक्षिण आफ्रिका 191 धावांनी आघाडीवर

19

सामना ऑनलाईन । ड्यूनेड्डीन

यजमान न्यूझीलंड व पाहुणा दक्षिण आफ्रिकन संघ यांच्यामध्ये येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना चौथ्या दिवसअखेरीस रंगतदार अवस्थेत आला असून आता उद्या कसोटीच्या अंतिम दिवशी कोणता संघ बाजी मारतो याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. सामना ड्रॉही होऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 308 धावांमध्ये आटोपल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 341 धावा तडकावल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 1 बाद 38 या धावसंख्येवरून शनिवारी सकाळच्या सत्रात पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र दक्षिण आफ्रिकन संघाला चौथ्या दिवशी फक्त 186 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकन चौथ्या दिवसअखेर 6 बाद 224 धावा केल्या असून आता त्यांचा संघ 191 धावांनी पुढे आहे. सलामीवीर डीन एल्गारने 89 धावा केल्या तसेच फाफ डय़ुप्लेसिस 56 धावांवर खेळत आहे.

आता उद्या रविवारी न्यूझीलंड संघ दक्षिण आफ्रिकेचे उर्वरित चार फलंदाज झटपट बाद करतोय की दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडचा डाव गडगडतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. न्यूझीलंडकडून जीतन पटेल व नील वॅगनर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. जीतन पटेल याने सलग 28 षटके गोलंदाजी टाकण्याचा पराक्रम केला हे विशेष

आपली प्रतिक्रिया द्या