रस्त्यावर ‘शेंगदाणे’ विकणाऱ्या खेळाडूने चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचवले

36

सामना ऑनलाईन । पुणे

मंगळवारी आयपीएल प्ले ऑफमधील पहिला सामना चेन्नई आणि हैदराबाद संघामध्ये खेळला जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी निगडी याच्यावर सर्वांची नजर असणार आहे. साखळीतील अखेरच्या सामन्यात लुंगी निगडीने आपल्या दमदार प्रदर्शनाने सर्वांनाच प्रभावित केले होते. एकेकाळी रस्त्यावर शेंगदाणे विकणारा हा खेळाडू आज आयपीएल गाजवतो आहे.

धोनी – विल्यमसन आमने-सामने; कोणाला मिळणार फायनलचे तिकीट?

पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये चेन्नईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लुंगी निगडीने पंजाबच्या फलंदाजांना झटपट बाद केले. लुंगीने विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल, स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारा लोकेश राहूल, पंजाबचा कर्णधार आर. अश्विन आणि अॅन्ड्र्यू टायला बाद केले. लुंगीला चेन्नईने ५० लाखांना खरेदी केले होते. आज आयपीएल गाजवणाऱ्या या खेळाडूवर कधीकाळी रस्त्यावर बसून शेंगदाणे विकण्याची पाळी आली होती.

वडिलांच्या मृत्यूमुळे लुंगी सुरुवातीचे सामने खेळू शकला नव्हता. परंतु त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले. लुंगीने आतापर्यंत ५ सामन्यात ९ बळी घेतले आहेत. पंजाबविरुद्ध लुंगीने या सत्रातील सर्वोत्तम कामगिरी आहे. या सामन्यात त्याने चार षटकांची गोलंदाजी करताना एक निर्धाव षटक टाकत फक्त १० धावा दिल्या आणि ४ महत्त्वपूर्ण बळी टिपले.

आपली प्रतिक्रिया द्या