हिंदुस्थानातून परतलेल्या आफ्रिकेच्या खेळाडूंना विलिगीकरणात राहण्याचे आदेश

क्रिकेट मालिकेसाठी हिंदुस्थानात आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ कोरोना व्हायरसमुळे मालिका रद्द झाल्यानंतर त्यांच्या मायदेशी परतला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतर सर्व खेळाडूंना स्वत:ला विलीगीकरणात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संघाचे फिजीयो जे संघासोबत हिंदुस्थान दौऱ्यावर आले होते. त्यांच्या सल्ल्यानंतर खेळाडूंना त्यांच्याच घरात विलीगीकरणात राहण्याचे आदेश दिले आहेत. देशात कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून त्यांना विलीगीकरणात राहण्याचे आदेश दिले आहेत.

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका होणार होती. यातील पहिला सामना 12 मार्चला धर्मशाळा येथे रंगणार होता. मात्र पावसाने खेळ केल्याने हा सामना रद्द करावा लागला होता. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे या लढतीचे फक्त 40 टक्के तिकीटविक्री झाली होती. मालिकेतील दुसरा सामना रविवारी 15 मार्चला लखौ आणि तिसरा सामना 18 मार्चला कोलकाता येथे होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता हे सामने रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या